पण तू नाही त्यातला..
एकदा बसून विचार केला , की जर मन येऊन आपल्याशी बोलले तर ते काय म्हणेल.. काय सांगेल... काही गप्पा केल्या मना सोबत , आणि त्यानी सांगितलेलं कवितेत सांगायेचा प्रयत्न करतोय.. मन कधी खोटे बोलत नाही.. :) आपण काय करू शकतो , आणि काय नाही , हे मन चांगले ओळखून असते.. :) तू नाही त्यातला , ही अशी ओळ , जी मनातून कानात अनेक वेळा आली.. कविता कशी वाटली , जरूर comments मधे पोस्ट करा. .. पण तू नाही त्यातला… .. गर्दीत ह्या जगाच्या , तू ही गेलास हरवून.. भोगले मी दुख तुझेच , अश्रू माझेच सावरून.. मूढ ह्या प्रपंच्यात शोधिसी , शहाणपणाचा पुतळा.. पण … तू नाही त्यातला .. .... विकलेस हास्य आपुले , अजाण भावनान साठी.. रिते राहीले क्षण काही , हरवलेल्या मृगजळा पाठी.. स्वार्थी त्या वाळूत बघ , स्वाभिमान कसा रूतला.. पण …. तू नाही त्यातला.. .... लकतरे चंगुलपणा ची , तू ही वेशीवर असुदे काही.. वस्तीत आंधळ्यांच्या , गर्व , पुण्याईचा न्याय करू पाही.. नावाचे उसासे...