पोस्ट्स

मार्च, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परत तेच..

परत तेच..   करतो वेगळा विचार ,  कारण परत तेच.. उत्तरे तुझी वेगळी ,  प्रश्न माझे परत तेच.. ओळखीचे दिसणारे ,  पण चेहरे सगळे दुहेरी.. आरश्यात   प्रतिबिंब   माझे ,  अजूनही परत तेच.. ... काळ काढतो पाऊलवाट ,  निखारे परत तेच.. चालत राहिलो माझ्या मार्गी ,  मात्र अंतर परत तेच.. संपेना दुरावा ,  दिसे आठवणींच मृगजळ.. यश   अपय शाची झुंज ,  पदरी परत तेच.. ... रेशांसोबत नियती चा सौंवाद ,  परिणामी परत तेच.. देवा दारीही सोबत तीच सावली ,  निष्कर्षात परत तेच.. क्षण काही विसरलेले ,  अश्रूंची काही कुंपणे..     श्वासाची   शर्यत   तासांशी ,  आयुष परत तेच... ... ......