पोस्ट्स

मे, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अहंकार

शब्दांचा जीव घेतो ,  तो अहंकार.. तुझ्या माझ्यात मीच आणतो ,  तो अहंकार.. मना विरुद्ध मन मारतो ,  तो अहंकार... अश्रु आणि विवंचनांचा खेळ मांडतो ,  तो अहंकार...   उत्तरान विरुद्ध प्रश्न जाणतो ,  तो अहंकार.. अस्तित्वाचा आरशात तडा पाडतो ,  तो अहंकार... सावली वर आनंदाच्या ,  दुख सांडतो ,  तो अहंकार.. संघर्षात भूतकाळाच्या वर्तमान जळतो ,  तो अहंकार.. सोहळा अंतरांचा नात्यात कोरतो ,  तो अहंकार.. ठेवून तारण पुण्याई ,  गर्व पाळतो ,  तो अहंकार.. उनाड प्रकाशात ,  शिंतोडे अंधाराचे टाकतो ,  तो अहंकार.. गर्दीत आपुलकीच्या एकटाच असतो ,  तो अहंकार... ... ...