अहंकार


शब्दांचा जीव घेतोतो अहंकार..
तुझ्या माझ्यात मीच आणतोतो अहंकार..
मना विरुद्ध मन मारतोतो अहंकार...
अश्रु आणि विवंचनांचा खेळ मांडतोतो अहंकार... 

उत्तरान विरुद्ध प्रश्न जाणतोतो अहंकार..
अस्तित्वाचा आरशात तडा पाडतोतो अहंकार...
सावली वर आनंदाच्यादुख सांडतोतो अहंकार..
संघर्षात भूतकाळाच्या वर्तमान जळतोतो अहंकार..

सोहळा अंतरांचा नात्यात कोरतोतो अहंकार..
ठेवून तारण पुण्याईगर्व पाळतोतो अहंकार..
उनाड प्रकाशातशिंतोडे अंधाराचे टाकतोतो अहंकार..
गर्दीत आपुलकीच्या एकटाच असतोतो अहंकार... ... ...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्यातल गणित..