तू इथे आली होतीस का.... ?
तू इथे आली होतीस का.... ? पर्वा , आपण नेहमी न चुकता जायचो त्या ठिकाणी काही वेळ जाऊन बसलो.. खूप काही बदलले आहे ग तिथे ! आपल्या सारखे गप्पा मारत बसणारे लोक भरपूर येतात.. तुझ्या म्हण्या प्रमाणे लाटांचा आवाज ऐकत बसलो.. काही प्रमाणात सौम्य वाटल्या ग... जाता जाता , त्यांचं पण काही तुझ्या सोबत घेऊन गेलीस का ? आता मी तुझी वाट नाही बघत , पण हो , त्या लाटा , अजून तुझी चाहूल अहेका ? हे शोधून मात्र परत गेल्या.. संध्याकाळ च्या गार वार्या सोबत , काही शब्द तुझे माझे , अगदी कानाशी येऊन , कुठे तरी नाईसे झाले.. तसही आपल तसच होतं न ? नेमक काहीतरी सांगायच राहून जायेच.. विचार केला , की कशी शेवट पर्यन्त आपली ती सवय मोडली नाही... एक विचारू का ? तू इथे आली होतीस का ? काही शब्द , क्षण , सगळे इथे विस्कटलेले दिस्तायेत , त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला होतास का ? जमले नाही तुला , पण त्या बाबतीत आपली गट्टी आहेच ना.. काही ग...