तू इथे आली होतीस का.... ?

तू इथे आली होतीस का.... ?

पर्वाआपण नेहमी न चुकता जायचो त्या ठिकाणी काही वेळ जाऊन बसलो..
खूप काही बदलले आहे ग तिथे ! 
आपल्या सारखे गप्पा मारत बसणारे लोक भरपूर येतात.. 
तुझ्या म्हण्या प्रमाणे लाटांचा आवाज ऐकत बसलो.. 
काही प्रमाणात सौम्य वाटल्या ग... 
जाता जातात्यांचं पण काही तुझ्या सोबत घेऊन गेलीस का
आता मी तुझी वाट नाही बघतपण होत्या लाटा
अजून तुझी चाहूल अहेका ? हे शोधून मात्र परत गेल्या..

संध्याकाळ च्या गार वार्‍या सोबतकाही शब्द तुझे माझेअगदी कानाशी येऊन
कुठे तरी नाईसे झाले.. तसही आपल तसच होतं न ? 
नेमक काहीतरी सांगायच राहून जायेच.. विचार केला
की कशी शेवट पर्यन्त आपली ती सवय मोडली नाही... एक विचारू का?
तू इथे आली होतीस का ? काही शब्दक्षणसगळे इथे विस्कटलेले दिस्तायेत
त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला होतास का
जमले नाही तुलापण त्या बाबतीत आपली गट्टी आहेच ना..
काही गोष्टी दोघांना कधीच जमल्या नाहीत..

जिथे बसलोतिथल्या मातीतकाही अंधुक नवे कोरलेली दिसली
असा सगळा वेडे पणा तुला आवडत होता,
एक ओळखीची भावना त्यातून डोकावताना जाणवली.. 
खरच सांग मलातू इथे आली होतीस का?

ह्या क्षणात ईत्क लक्षात आल की बराच काळ खूप वेगाने पुढे निघून गेलाय.. 
आपल्या वेळात वेळ काढून भेटणं आता शक्य नाहीच.. 
जुने काही रंग आयुष्याचे परत जगावेअस पटकन वाटून जात..
गजबजनवे अनेक चेहेरे आणि बरच काही असूनही,
काही तरी हरवल्या सारखं वाटते

खरं तर आता इथे पूर्वीचा मी नाहीआणि तू ही नाही..
तरी परत वळून जातानातुझी हाक ऐकू येते,
क्षणिक ते आनंद अजूनही माला मोहात पाडून जातात...         
खरच सांग मलातू इथे आली होतीस का?

  









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्यातल गणित..

अहंकार