स्वप्नातली गर्लफ्रेंड.....
स्वप्नातली गर्लफ्रेंड.....
स्वप्नातली गर्लफ्रेंड माझी आज पुन्हा
दिसली..
पाहून माझ्या कडे, तशीच
लाजून हसली.. ..
चेहेरा नेहमीच तिचा, प्रेमाची
चाहूल देतो..
मनात माझिया पुन्हा एक, आनंदाचा
पाऊस येतो.. ....
कुठे तरी ओल्या मातीवर ती, कोरते
माझे नाव..
अल्पकालीन असो पण त्यात, भावनांचा
नाही अभाव..
हातात तिचा हात नाही, न
नशीबात तिच्या रेषा..
हारलेला खेळ मांडायेची, वेडी
अन खुळी आशा.. ....
प्रीतीची व्याक्ख्या माझी, तिला
आवर्जून सांगणार होतो..
एकदाच का असेना, तिला
वास्तवात आणणार होतो..
म्हंटलं थांब आज तरी, तुझाकडे
निरखून माला पाहुदे...
ती म्हणे होत आली सकाळ, माला
स्वप्नीच राहुदे.. ...
Very Nice!! When are you publishing the book?
उत्तर द्याहटवाVery nice!! When is the book releasing?
उत्तर द्याहटवा