अहंकार


शब्दांचा जीव घेतो, तो अहंकार..
तुझ्या माझ्यात मीच आणतो, तो अहंकार..
मना विरुद्ध मन मारतो, तो अहंकार...
अश्रु आणि विवंचनांचा खेळ मांडतो, तो अहंकार... 

उत्तरान विरुद्ध प्रश्न जाणतो, तो अहंकार..
अस्तित्वाचा आरशात तडा पाडतो, तो अहंकार...
सावली वर आनंदाच्या, दुख सांडतो, तो अहंकार..
संघर्षात भूतकाळाच्या वर्तमान जळतो, तो अहंकार..

सोहळा अंतरांचा नात्यात कोरतो, तो अहंकार..
ठेवून तारण पुण्याई, गर्व पाळतो, तो अहंकार..
उनाड प्रकाशात, शिंतोडे अंधाराचे टाकतो, तो अहंकार..
गर्दीत आपुलकीच्या एकटाच असतो, तो अहंकार... ... ...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तू इथे आली होतीस का.... ?

आयुष्यातल गणित..