पण तू नाही त्यातला..


एकदा बसून विचार केला, की जर मन येऊन आपल्याशी बोलले तर ते काय म्हणेल.. काय सांगेल... काही गप्पा केल्या मना सोबत, आणि त्यानी सांगितलेलं कवितेत सांगायेचा प्रयत्न करतोय.. मन कधी खोटे बोलत नाही.. :) आपण काय करू शकतो, आणि काय नाही, हे मन चांगले ओळखून असते.. :) तू नाही त्यातला, ही अशी ओळ, जी मनातून कानात अनेक वेळा आली.. कविता कशी वाटली, जरूर comments मधे पोस्ट करा. ..

पण तू नाही त्यातला…..


गर्दीत ह्या जगाच्या, तू ही गेलास हरवून..

भोगले मी दुख तुझेच, अश्रू माझेच सावरून..

मूढ ह्या प्रपंच्यात शोधिसी, शहाणपणाचा पुतळा..

पण… तू नाही त्यातला.. ....


विकलेस हास्य आपुले, अजाण भावनान साठी..

रिते राहीले क्षण काही, हरवलेल्या मृगजळा पाठी..

स्वार्थी त्या वाळूत बघ, स्वाभिमान कसा रूतला..  

पण…. तू नाही त्यातला.. ....


लकतरे चंगुलपणा ची, तू ही वेशीवर असुदे काही..

वस्तीत आंधळ्यांच्या, गर्व, पुण्याईचा न्याय करू पाही..

नावाचे उसासे केवळ, किनारा कुठे तुज गवसला..

पण… तू नाही त्यातला.. ....


विरंगुळा अस्तित्वाचा, केलास गहाळ सावली पोटी...

द्रोह, निराशा, आणि उपेक्षा, राहिल्या मात्र ओठी...

हिशेब ठेवणे सार मागे, प्रवास जरी उन्हातला..

पण मित्रा…. खर सांगतो.. तू नाही त्यातला... .....   


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तू इथे आली होतीस का.... ?

आयुष्यातल गणित..