माझा मनात मी
माझ्या मनात मी माझ्या मनात मी , असतो आनंदी.. अशा आकांश्यांना नाही कसलीच बंदी.. प्रेम आणि द्वेष जिथे असतात एक समान.. खोट्या मी पणा ची सावली , इथे तरी नाही निदान.. ... माझ्या मनात मी , शोधतो एक नवे आभाळ.. जिथे अंधाराची वाट पाहत नाही सकाळ.. आभाळ माझे ते , विविध रंगनने रांगेलेले.. वार्याच्या दिशेला विसरून , आपल्यातच रमलेल.. .... माझ्या मनात मी , बोलतो कधी न बोललेल.. भावनांच एक विश्व आतल्या आत कोरलेल.. .. वेगळा एक चेहरा दिसतो , माझाच माला आरशात.. बघितला नौता असा , त्याला मी बर्याच वर्षात.. माझ्या मनात मी , भेटतो देवाला सहज.. प्रार्थने मधल्या बोलीची त्याला , इथे नाही गरज.. उत्तर मिळत नाहीत , ह्याचीच वाटे खंत.. पण माझ्या मनात मी , तरीही असतो स्वत्चछंद... ... पण माझ्या मनात मी , तरीही असतो स्वत्चछंद... ... ...