माझा मनात मी


माझ्या मनात मी

माझ्या मनात मी, असतो आनंदी..
अशा आकांश्यांना नाही कसलीच बंदी..
प्रेम आणि द्वेष जिथे असतात एक समान..
खोट्या मी पणा ची सावली, इथे तरी नाही निदान.. ...

माझ्या मनात मी, शोधतो एक नवे आभाळ..
जिथे अंधाराची वाट पाहत नाही सकाळ..
आभाळ माझे ते, विविध रंगनने रांगेलेले..
वार्‍याच्या दिशेला विसरून, आपल्यातच रमलेल.. ....

माझ्या मनात मी, बोलतो कधी न बोललेल..
भावनांच एक विश्व आतल्या आत कोरलेल.. ..
वेगळा एक चेहरा दिसतो, माझाच माला आरशात..
बघितला नौता असा, त्याला मी बर्‍याच वर्षात..

माझ्या मनात मी, भेटतो देवाला सहज..
प्रार्थने मधल्या बोलीची त्याला, इथे नाही गरज..
उत्तर मिळत नाहीत, ह्याचीच वाटे खंत..  
पण माझ्या मनात मी, तरीही असतो स्वत्चछंद... ...  
पण माझ्या मनात मी, तरीही असतो स्वत्चछंद... ...

 

 



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तू इथे आली होतीस का.... ?

आयुष्यातल गणित..