पोस्ट्स

तू इथे आली होतीस का.... ?

तू इथे आली होतीस का....  ? पर्वा ,  आपण नेहमी न चुकता जायचो त्या ठिकाणी काही वेळ जाऊन बसलो.. खूप काही बदलले आहे ग तिथे !   आपल्या सारखे गप्पा मारत बसणारे लोक भरपूर येतात..   तुझ्या म्हण्या प्रमाणे लाटांचा आवाज ऐकत बसलो..  काही प्रमाणात सौम्य वाटल्या ग...   जाता जाता ,  त्यांचं पण काही तुझ्या सोबत घेऊन गेलीस का ?  आता मी तुझी वाट नाही बघत ,  पण हो ,  त्या लाटा ,  अजून तुझी चाहूल अहेका  ?  हे शोधून मात्र परत गेल्या.. संध्याकाळ च्या गार वार्‍या सोबत ,  काही शब्द तुझे माझे ,  अगदी कानाशी येऊन ,  कुठे तरी नाईसे झाले.. तसही आपल तसच होतं न  ?  नेमक काहीतरी सांगायच राहून जायेच.. विचार केला ,  की कशी शेवट पर्यन्त आपली ती सवय मोडली नाही... एक विचारू का ? तू इथे आली होतीस का  ?  काही शब्द ,  क्षण ,  सगळे इथे विस्कटलेले दिस्तायेत ,  त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला होतास का ?  जमले नाही तुला ,  पण त्या बाबतीत आपली गट्टी आहेच ना.. काही ग...

पण तू नाही त्यातला..

एकदा बसून विचार केला , की जर मन येऊन आपल्याशी बोलले तर ते काय म्हणेल.. काय सांगेल... काही गप्पा केल्या मना सोबत , आणि त्यानी सांगितलेलं कवितेत सांगायेचा प्रयत्न करतोय.. मन कधी खोटे बोलत नाही.. :) आपण काय करू शकतो , आणि काय नाही , हे मन चांगले ओळखून असते.. :) तू नाही त्यातला , ही अशी ओळ , जी मनातून कानात अनेक वेळा आली..  कविता कशी वाटली , जरूर  comments  मधे पोस्ट करा. .. पण तू नाही त्यातला… .. गर्दीत ह्या जगाच्या ,  तू ही गेलास हरवून.. भोगले मी दुख तुझेच ,  अश्रू माझेच सावरून.. मूढ   ह्या प्रपंच्यात शोधिसी ,  शहाणपणाचा पुतळा.. पण …  तू नाही त्यातला .. .... विकलेस हास्य आपुले ,  अजाण भावनान साठी.. रिते राहीले क्षण काही ,  हरवलेल्या मृगजळा पाठी.. स्वार्थी त्या वाळूत बघ ,  स्वाभिमान कसा रूतला..    पण ….  तू नाही त्यातला.. .... लकतरे चंगुलपणा ची ,  तू ही वेशीवर असुदे काही.. वस्तीत आंधळ्यांच्या ,  गर्व ,  पुण्याईचा न्याय करू पाही.. नावाचे उसासे...

अहंकार

शब्दांचा जीव घेतो ,  तो अहंकार.. तुझ्या माझ्यात मीच आणतो ,  तो अहंकार.. मना विरुद्ध मन मारतो ,  तो अहंकार... अश्रु आणि विवंचनांचा खेळ मांडतो ,  तो अहंकार...   उत्तरान विरुद्ध प्रश्न जाणतो ,  तो अहंकार.. अस्तित्वाचा आरशात तडा पाडतो ,  तो अहंकार... सावली वर आनंदाच्या ,  दुख सांडतो ,  तो अहंकार.. संघर्षात भूतकाळाच्या वर्तमान जळतो ,  तो अहंकार.. सोहळा अंतरांचा नात्यात कोरतो ,  तो अहंकार.. ठेवून तारण पुण्याई ,  गर्व पाळतो ,  तो अहंकार.. उनाड प्रकाशात ,  शिंतोडे अंधाराचे टाकतो ,  तो अहंकार.. गर्दीत आपुलकीच्या एकटाच असतो ,  तो अहंकार... ... ...

परत तेच..

परत तेच..   करतो वेगळा विचार ,  कारण परत तेच.. उत्तरे तुझी वेगळी ,  प्रश्न माझे परत तेच.. ओळखीचे दिसणारे ,  पण चेहरे सगळे दुहेरी.. आरश्यात   प्रतिबिंब   माझे ,  अजूनही परत तेच.. ... काळ काढतो पाऊलवाट ,  निखारे परत तेच.. चालत राहिलो माझ्या मार्गी ,  मात्र अंतर परत तेच.. संपेना दुरावा ,  दिसे आठवणींच मृगजळ.. यश   अपय शाची झुंज ,  पदरी परत तेच.. ... रेशांसोबत नियती चा सौंवाद ,  परिणामी परत तेच.. देवा दारीही सोबत तीच सावली ,  निष्कर्षात परत तेच.. क्षण काही विसरलेले ,  अश्रूंची काही कुंपणे..     श्वासाची   शर्यत   तासांशी ,  आयुष परत तेच... ... ......

आयुष्यातल गणित..

आयुष्यातल गणित.. आयुष्यातल गणित अनुभव्ण , आहे खूप सहज.. आवडणार अधिक , न आवडणार वजा , येऊढीच असते गरज.. सुखा ची वाटणी ही दुखाशी , असे होणे निश्चित.. गुणाकार ह्या सर्वात , राहतो केवळ अपेक्षित.. ..             

मैत्रिणीच लगन..

  मैत्रिणीचे लग्न.. अजून एका मैत्रिणीने ,  दिले लग्नाचे आमंत्रण.. दर वर्षी न चुकता येणारा ,  तो महत्वाचा क्षण.. झब्याला परत ,  इस्त्री करून घेण्याची आली वेळ.. देवा ,  अरे का रे असा हा जिवघेणा खेळ.. .. शुभेछंच्या पौसात ,  सौंसार तिचा रंगणार.. बाहेर अक्ष्तांच ताट ,  माझ्या हातात दिसणार.. तिला त्याचा डोळ्यात ,  दिसे प्रेमचा गोडवा.. त्यांचे छायाचित्र काढून ,  आपण इतिहास घडवा.. ... पेढे ,  जिलब्या ,  आणि साथीला पुरण पोळी.. मनात मात्र गिळलेली ,  प्रेम भावनांची कडू गोळी..    भाग्यवान ठरला तो ,  आणि ती झाली सौभाग्यवती.. भविष्यात आता पार पाडेन ,  मामा झाल्याची ख्याती.. .....  

स्वप्नातली गर्लफ्रेंड.....

स्वप्नातली गर्लफ्रेंड..... स्वप्नातली गर्लफ्रेंड माझी आज पुन्हा दिसली.. पाहून माझ्या कडे ,  तशीच लाजून हसली.. .. चेहेरा नेहमीच तिचा ,  प्रेमाची चाहूल देतो.. मनात माझिया पुन्हा एक , आनंदाचा पाऊस येतो.. .... कुठे तरी ओल्या मातीवर ती ,  कोरते माझे नाव.. अल्पकालीन   असो पण त्यात ,  भावनांचा नाही अभाव.. हातात तिचा हात नाही ,  न नशीबात तिच्या रेषा.. हारलेला खेळ मांडायेची ,  वेडी अन खुळी आशा.. .... प्रीतीची व्याक्ख्या माझी ,  तिला आवर्जून सांगणार होतो.. एकदाच का असेना ,  तिला वास्तवात आणणार होतो..    म्हंटलं थांब आज तरी ,  तुझाकडे निरखून माला पाहुदे...    ती म्हणे होत आली सकाळ ,  माला स्वप्नीच राहुदे.. ...